स्टेट गव्हर्नमेंट ची एमसीए सीईटी महत्व आणि फायदे??

 स्टेट गव्हर्नमेंट ची एमसीए सीईटी महत्व आणि फायदे??

MAH-MCA CET 2022 Last Date


प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

जे विद्यार्थी बीसीए, बीसीएस किंवा बीएस्सी कॉम्पुटर किंवा 12 वीला गणित होता किंवा ग्रॅज्युएशन ला मॅथेमॅटिक्स किंवा स्टेटेस्टीकस आहे असे सर्व विध्यार्थी एमसीए ला प्रवेश घेण्यासाठी पात्र होतात. 

ओपन कॅटेगरी साठी पासींग पात्रता आहे 50%

रिझर्वेशन कॅटेगरी साठी पासींग पात्रता आहे 45%

एमसीए प्रवेश प्रक्रिया ही कॅप म्हणजेच केंद्रीय प्रवेश प्रक्रिया या माध्यमातून होते. महाराष्ट्र राज्य एमसीए सीईटी परीक्षा आयोजित करते आणि डीटीई कॅप प्रोसेस आयोजित करते. 

पुणे युनिव्हर्सिटी च्या अंतर्गत येणारे जी व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट ची कॉलेज आहेत यापैकी कोणत्याही कॉलेज मध्ये एमसीए या कोर्स ला प्रवेश घ्यायचा असेल तर कॉमन एन्ट्रान्स टेस्ट म्हणजे सीईटी अनिवार्य आहे. सीईटी परीक्षा पार पडल्यानंतर मेरिट लिस्ट जाहीर होते. विद्यार्थ्यांनी आपापलं मेरिट पाहून मग कॅप राऊंड मध्ये सहभागी व्हायचं आहे.

कॅप राऊंड मध्ये सहभागी होण्यापूर्वी तुम्ही प्रत्येक कॉलेज चे पाठीमागच्या वर्षीचे कटऑफ स्कोर पाहू शकता. हा कटऑफ पाहिला की तुम्हाला अंदाज येईल की तुमचं मेरीट पाहता तुम्हाला कोणत्या कॉलेजला प्रवेश मिळू शकतो.

मात्र विद्यार्थी मित्रहो सीईटी शिवाय तुम्ही पुणे युनिव्हर्सिटी च्या कोणत्याच एमसीए कॉलेज ला प्रवेश घेऊ शकणार नाही. 

एमसीए सीईटी आणि कॅप प्रोसेस मधून प्रवेश घेण्याचे फायदे

सीईटी सोबत अजून काही महत्वाचे फायदे आहेत ज्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. आता ते काय आणि कोणते फायदे आहेत ते पाहू,

  1. सीईटी मुळे तुम्ही पुणे युनिव्हर्सिटी च्या कोणत्याही एमसीए कॉलेज ला प्रवेश घेऊ शकता
  1. समजा तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये आहात तर तुम्ही ईडब्लूसी (EWC - Economical Weaker Action) मधून प्रवेश घेऊ शकता. आता याचा फायदा काय आहे. समजा एखाद्या कॉलेज ची  फी 90000/- रुपये आहे तर ईडब्लूसी मुळं 45000/- रुपये एवढीच फी भरावी लागणार आहे. म्हणजे 50 टक्के पर्यंत सवलत ही पूर्ण फिमधून मिळते.
  1. जर तुम्ही ओबीसी या कॅटेगरी मधून असाल तर योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून एमसीए साठी फक्त 50 टक्के फी भरून प्रवेश घेऊ शकता.
  1. जर  SC/VJNT/ST/NT या कास्ट मधून एखादा विद्यार्थी एमसीए साठी प्रवेश घेऊ इच्छितो त्या विद्यार्थ्यांना जर आवश्यक ती कागदपत्रे असतील तर फक्त डेव्हलपमेंट फी भरावी लागते. 100 टक्के फी माफ होते. म्हणजे ट्युशन फी 90000/- असेल तर संपूर्ण फी माफ होते. तुम्हाला फक्त जी काही सिक्युरिटी फी किंवा डेव्हलपमेंट फी असते तेवढीच भरावी लागते. 
  1. TFWS Tuition Fee Waiver Scheme ही स्कीम अशा विद्यार्थ्यांना आहे ज्यांचा सीईटी स्कोअर खूप जास्त आहे. अशा विद्यार्थ्यांना फक्त 2000/- रुपये भरून एमसीए ला प्रवेश मिळतो. 

वरील पैकी कोणत्याही स्कीम मधून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला तर त्या विद्यार्थ्यांची जी काही फी आहे ती सर्व फी स्कॉलरशिप च्या माध्यमातून सरकार पूर्तता करत असतं. सरकारकडून एवढ्या मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांनसाठी  उच्च तंत्र शिक्षण घेण्यासाठी खूप मोठया प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून स्कॉलरशिप दिल्या जातात.

या स्कॉलरशिप चा फायदा असेच विद्यार्थी घेऊ शकतात ज्यांनी कॉमन एन्ट्रान्स टेस्ट म्हणजे सीईटी दिली आहे, ज्यांच्या सीईटी चा निकाल निगेटिव्ह मध्ये नाही, ज्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे, आणि मुख्य म्हणजे ज्यांनी कॅप राऊंड मधून एमसीए साठी प्रवेश घेतला आहे,

मात्र विद्यार्थी मित्रांनो,

ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिली आहे मात्र त्यांनी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेतला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना वरील उल्लेख केलेली सरकारची कोणतीच स्कॉलरशिप मिळत नाही.

अशा सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजची पूर्ण फी भरावी लागते. कुठलीच सवलत मिळत नाही. 

सर्व विद्यार्थ्यांना एमसीए साईटी आणि कॅप प्रोसेस याचं महत्व कळावं म्हणून ही पोस्ट लिहिली आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना ही पोस्ट शेअर करा जेणेकरून असे सर्व विद्यार्थी ज्यांना एमसीए ला प्रवेश तर घ्यायचा आहे मात्र लाख दीड लाख रुपये फी भरण्याची परिस्थिती नाही त्यामुळे असे विद्यार्थी एमसीए सारख्या उच्च शिक्षणापासून वंचित राहू शकतात. परिस्थिती अभावी अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं.  हे होऊ नये असं आपणास वाटत असेल तर ही पोस्ट जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांना शेअर करा. 

एमसीए सीईटी ची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा 20 एप्रिल. 


एमसीए सीईटी, कॅप प्रोसेस आणि एमसीए प्रवेश प्रक्रिया याबद्दल काहीही माहिती हवी असेल तर निःसंकोचपणे मला कॉल करू शकता.

Prof.Dr.Manisha More

9511775185


एमसीए सीईटी फॉर्म फिलिंग संपुर्ण माहिती बघण्यासाठी इथे क्लिक करा

एमसीए सीईटी सीलॅबस आणि मार्किंग स्कीम संपूर्ण माहिती मिळण्यासाठी इथे क्लिक करा




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या