स्टेट गव्हर्नमेंट ची एमबीए सीईटी महत्व आणि फायदे

 स्टेट गव्हर्नमेंट ची एमबीए सीईटी महत्व आणि फायदे...

MAH-MBA CET 2022 last date


एमबीए म्हणजे मास्टर ईन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हा पदवी नंतरचा दोन वर्षांचा पदव्युत्तर कोर्स आहे. बिझनेस म्हणजे काय? तो कशा पद्धतीने मॅनेज करायचा आणि त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच व्यवस्थापन कसं करायचं हे शिकवलं जाणारा हा कोर्स आहे.

यामध्ये प्रामुख्याने मार्केटिंग, फायनान्स, एचआर, आयटी, ऍग्री बिझनेस, बिझनेस अनालायटीक्स असे स्पेशलायझेशन विद्यार्थी निवडून हा कोर्स पूर्ण करतात. 

हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर मार्केटिंग मॅनेजर, फायनान्स मॅनेजर, एचआर मानेजर, आयटी मॅनेजर, डेटा अनालायटीक्स, डेटा अनालिस्ट, डेटा सायंटिस्ट अशा प्रकारचे जॉब मिळू शकतात.

एमबीए साठी कोण प्रवेश घेऊ शकतो??

कोणत्याही शाखेचा पदवीधर असणारा विद्यार्थी  एमबीए ला प्रवेश घेऊ शकतो. 

एमबीए साठी प्रवेश पात्राता काय आहे??

कोणत्याही शाखेचा पदवीधर जे ओपन कास्ट मधून आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना 50% मार्क्स पदवीला असणं आवश्यक. 

जे विद्यार्थी रिझर्व्हेशन कास्ट मधून आहेत अशा विद्यार्थ्यांचे पदवी मार्क्स 45% असणं गरजेचं आहे.

विद्यार्थ्यांनी स्टेट गव्हर्नमेंट ची कॉमन एन्ट्रान्स टेस्ट दिलेली असणं बंधनकारक आहे.

एमबीए कॉमन एन्ट्रान्स टेस्ट कोण देऊ शकतो??

कोणत्याही शाखेच्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारा विद्यार्थी किंवा ज्याची पदवी पूर्ण झाली आहे असा विद्यार्थी स्टेट गव्हर्नमेंट नी घेतली जाणारी कॉमन एन्ट्रान्स टेस्ट देऊ शकतो.

एमबीए प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे पार पडते?

विद्यार्थ्यांना सर्वात प्रथम स्टेट गव्हर्नमेंट नी घेतली जाणारी सीईटी टेस्ट ऑनलाइन फॉर्म भरून पहिला टप्पा पार करायचा आहे. 

एमबीए सीईटी फॉर्म कसा भरायचा ह्याची संपूर्ण माहिती इथे क्लिक करून पहा.

त्यानंतर सीईटी ची परीक्षा पार पडेल. परिक्षेनंतर काही दिवसांत निकाल जाहीर केला जातो. त्यानंतर मेरिट लिस्ट जाहीर होते. 

मेरिट लिस्ट जाहीर झाली की विद्यार्थी पुणे युनिव्हर्सिटी संलग्नित असणारी एमबीए ची कॉलेज कोणती आहेत हे पाहून त्या कॉलेज चा मागच्या वर्षीचा कटऑफ काय होता हे पाहू शकतात. यामुळे विद्यार्थ्यांना एक अंदाज येतो की त्यांना कोणत्या कॉलेज ला प्रवेश मिळू शकतो. 

मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी कॅप प्रोसेस सुरू होते. 

कॅप म्हणजे काय??

कॅप म्हणजे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया. पुणे युनिव्हर्सिटी संलग्नित कोणत्याही एमबीए कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर कॅप प्रोसेस मधून विद्यार्थ्यांना जावं लागतं. ऑनलाइन पध्दतीने डिटीई पोर्टल वरून ही प्रोसेस विद्यार्थ्यांनी करायची आहे. या प्रोसेस पूर्वी सर्व कागदपत्रे व्हेरिफिकेशन करून घ्यायची एक प्रोसेस असते ती प्रोसेस देखील करायची आहे.

कॅप प्रोसेस सुरू झाली की आपल्या आवडीची कॉलेज दिलेल्या ऑप्शन फॉर्म मध्ये भरून सबमिट करायचे असते. मग त्यानंतर सिलेक्शन लिस्ट जाहीर होते. आणि त्या लिस्ट मध्ये त्या विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज मिळालं आहे हे समजतं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या त्या कॉलेज ला प्रत्यक्षात जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची असते.

समजा विद्यार्थ्यांना कोणतंच कॉलेज मिळालं नसेल तर हे विद्यार्थी पुढच्या कॅप राऊंड मध्ये भाग घेतो आणि ऑप्शन फॉर्म भरतो. तर अशी साधारणपणे प्रवेश प्रक्रिया असते.

एमबीए सीईटी देऊन आणि कॅप मधून प्रवेश घेण्याचे काय फायदे आहेत??

स्टेट गव्हर्नमेंट ची एमबीए सीईटी दिल्याने विद्यार्थी कॅप मधून प्रवेश घेऊ शकतो. कॅप मधून प्रवेश घेण्याचे फायदे म्हणजे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती आहेत त्याचा लाभ घेता येतो. 

ह्या सवलती म्हणजे,

  1. ओपन कास्ट मधून असणारा विद्यार्थी योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून महाराष्ट्र शासनाने दिलेली इबीसी स्कीम किंवा EWS या स्कीम मधून 50% पर्यंतची शिष्यवृत्ती प्राप्त करू शकतो. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना फक्त 50% फी भरावी लागते. 
  1. OBC मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील 50% पर्यंत महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती मिळते. यांनाही फक्त 50% फी भरायची आहे. मात्र योग्य त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
  1. विद्यार्थी जर  SC/NT/VJNT या कास्ट मधून असेल आणि त्याच्याकडे सर्व आवश्यक ती कागदपत्रे असतील तर असे विद्यार्थी फक्त दोन ते पाच हजार रुपये भरून प्रवेश घेवू शकतात. वरची सर्व फी महाराष्ट्र शासन भारत असते.

शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल तर योग्य त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आणि कॅप प्रोसेस मधूनच प्रवेश घ्यावा लागतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी स्टेट गव्हर्नमेंट ची सीईटी दिलेली असणं गरजेचं आहे.

मात्र विद्यार्थ्यांनी सीईटी दिली आहे परंतु त्यांनी मनेजमेन्ट कोट्यातून प्रवेश घेतला आहे असे विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकत नाहीत.

सर्व विद्यार्थ्यांनी शासनाच्या ह्या सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ घ्यावा.

परिस्थिती अभावी उच्च शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रकारच्या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना खूप आवाक्या बाहेरच्या फिज असताना देखील अशा कॉलेज ना प्रवेश घेता येऊ शकतो याची माहिती मिळावी या उद्देशाने हा लेख लिहिला आहे.

हा लेख जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा जेणेकरून सर्व गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होईल.

एमबीए सीईटी शेवटची तारीख 20 एप्रिल आहे लक्षात ठेवा. सीईटी असेल तर आणि तरच अगदी पाच दहा हजारात तुम्ही लाख दीड लाख फी असणाऱ्या कॉलेजला एमबीए साठी प्रवेश घेवू शकता.

एमबीए सीईटी फॉर्म कसा भरायचा ह्याची संपूर्ण माहिती इथे क्लिक करून पहा.

एमबीए सीईटी सिलबस आणि मार्किंग स्कीम इथे क्लिक करून पाहा

एमसीए सीईटी का महत्वाची आहे आणि काय फायदे आहेत याची माहिती पहा इथे क्लिक करून



एमबीए/ एमसीए सीईटी आणि प्रवेश प्रक्रिया याविषयी अधिक माहिती हवी असेल तर निःसंकोचपणे कॉल करू शकता
प्रा. डॉ. मनिषा मोरे
9511775185


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या