सोशल मिडियावरील विकृती

 सोशल मीडियावरील काही विकृत महानग



Social media misbehave

सोशल मीडिया गैरवापर


खरंतर संपुर्ण जगाला आपल्या जवळ घेऊन येणारे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अलीकडील काही काळात इतकी लोकप्रिय झाली आहे की लोकं आता इंटरनेट शिवाय राहू शकत नाही.या टेक्नॉलॉजी मध्ये खूप अमुलाग्र बदल झाला आहे.कोरोनाच्या काळात आपण पाहिलं आहे की, बऱ्याच कंपन्यांनी कंपन्या बंद न ठेवता त्यांच्या एम्प्लॉयींना घरीच बसून त्यांचं काम करण्याचे आदेश दिले.याचा अर्थ असाच आहे की परिस्थिती कोणतीही येवो, तुमचं काम कधीच बंद होऊ नाही शकत.

अगदी घरी बसून,चालता चालता,बाहेर फिरायला गेल्यावर, सिनेमा गृहात, एवढंच काय तर घरातील टॉयलेट मध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या स्मार्ट फोनचा वापर करून काम पूर्ण करू शकता.एखादी ऑनलाइन मिटिंग अटेंड करू शकता.


सोशल मिडिया

Virtual world


टेक्नॉलॉजीचा अर्थात सोशल मीडियाचा सगळ्यात जास्त वापर कधी झाला असेल तर तो कोरोना काळात.शाळा कॉलेज प्रत्यक्षात बंद असून सुद्धा ऑनलाइन सुरुच राहिल्या.कंपन्या बंद असून सुद्धा ऑनलाइन सुरूच राहिल्या.घरातून बाहेर जाणं जरी बंद झालं असलं तरी ऑनलाइन ऑर्डर करून आपण घर बसल्या मागवून घेऊ शकलो.सांगण्याचा मतितार्थ हाच आहे की, सर्व काही बंद झालं तरी व्हर्चुअल जग मात्र सुरूच राहिलं.


सोशल मीडिया आणि वाईट विकृती

सोशल मीडिया

कोरोना काळात कॉलेज बंद होती त्यामुळे मी माझी आवड म्हणून ब्लॉगिंग चा छंद जोपासला. मराठीमधून मी दोन ब्लॉग सुरू केले.माझं लिखाण सुरू झालं.वेगवेगळ्या विषयावरील लेख लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्यासाठी मी सोशल मीडियाची मदत घेतली.फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम ,लिंकडईन, व्हाट्सएपच्या माध्यमातून माझे लिखाण लोकांच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.माझ्या ब्लॉगचे वाचक अजून वाढावे यासाठी मी फेसबुकवर माझे फेसबुक पेज आणि फेसबुक ग्रुप तयार केले.तसेच व्हाट्सएप ग्रुप देखील बनवले.

माझं सोशल नेटवर्क वाढविण्यासाठी मी माझ्या ग्रुप च्या ,फेसबुक पेज च्या आमंत्रण लिंक सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठविल्या.याचा मला फार फायदा झाला.माझं सोशल नेटवर्क वाढलं.माझ्या ग्रुप चे वाचक वाढले.

आमंत्रण पाठवताना मी अगदी मुद्देसूद टीप पाठविली होती की, या ग्रुप च्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लेख तुम्हाला वाचायला मिळतील.इथं तुम्हाला काहीतरी महत्वाची माहिती मिळू शकते.इथं तुम्हाला प्रोत्साहन, प्रेरणा मिळू शकते.ज्यांना लिखाणाची व वाचनाची आवड आहे अशांनीच हा ग्रुप जॉईन करावा.खूप लोकं जॉईन झाली. माझं सोशल नेटवर्क हळूहळू वाढू लागलं.

जिथं काहीतरी चांगलं होत असतं तिथं चोर पावलांनी वाईट कृत्य ही शिरकाव करतच असतं. या ग्रुप च्या माध्यमातून खूप चांगले वाचक मिळाले.माझ्या लिखाणाची दाद घेती गेली.लोकांच्या कडून माझ्या लिखाणाची पोचपावती देखील मिळाली.खूप चांगले चांगले अभिप्राय देखील मिळाले.यामुळे मला पुढील लिखाणास एक सकारात्मक ऊर्जा मिळत होती,प्रोत्साहन मिळत होतं.मात्र सोशल मीडियावर मला असे काही महानग मिळाले की, ज्यांना वाचनाचा काडीचाही रस नव्हता.

काही महानग सारखे मेसेज  करून त्रास द्यायचे.जसं की, हाय कशी आहेस', तू कुठे राहते, माझ्याशी मैत्री करायला आवडेल का?. बोल ना, तू बोलत का नाही?.

इथपर्यंत ठीक होतं मात्र, मागे रिप्लाय नाही दिल्याने काही महानग असे काही मेसेज द्यायचे जसं की, रिप्लाय नाही द्यायचा तर फ्रेंड रिकव्हेस्ट ऍक्सेप्ट का करायची?, बोल ना गं, रुसवा सोड की.

असे हे गंमतीशीर मेसेज पाहून पोटधरून हसणं मात्र रोज व्हायचं.काही महानग तर व्हिडीओ कॉल करून त्रास द्यायचे.काही महानग खूप घाणेरडे इमेजेस पाठवून इरिटेड करायचे.काही महानग माझ्याच फ्रेंड्स ना रिकव्हेस्ट पाठवून त्यांनाही असाच त्रास द्यायचे.

माझ्या व्हाट्सएपच्या ग्रुप वर सगळे मेम्बर प्रोफेशनल आहेत.ठराविक लोकं सोडली तर प्रत्यक्षात इथं कुणी कुणाला ओळखत नव्हतं.मित्रांचे मित्र असं करत करत ही संख्या वाढत वाढत खूप मोठी झाली.ईथं रोज कुणी ना कुणी काहीतरी प्रेरणादायी संदेश देत असतो.लोकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतात.माझ्याही ब्लॉग पोस्ट मी रोज अपलोड करत असते.

इथेही काही विकृती भेटल्या.ज्यांच्या डीपीला लेडीज चा फोटो आहे अशा लेडीज ना पर्सनली मेसेज करणाऱ्या व्यक्ती पाहायला मिळाल्या.

मेसेज हाय हॅलो पर्यंत ठीक होता , पण यापुढे जाऊन, ' तू माझ्याशी मैत्री करशील का?', रिप्लाय दे ना, रिप्लाय नाही दिला तर मग अर्वाच्च भाषा वापरून घाणेरडे मेसेज करणारे,घाणेरडे फोटो पाठवणारे महानग भेटले.

अशा प्रकारचे मेसेज खासकरून लेडीज ना टार्गेट करून केले जायचे.हे विकृत महिलांच्या फोनवर व्हलगर,नॉनव्हेज मेसेज करून विनाकारण त्रास द्यायचे.अशा प्रकारे त्रास देणाऱ्या लोकांच्या मुळे कित्येक महिलांचे संसार उदवस्त झालेले आपण या आधीही वर्तमान पत्रात वाचलं आहे,टीव्हीवर पाहिलं आहे.कित्येक महिलांना ब्लॅकमेल देखील केलं जात आहे हेही आपण टीव्हीवर पाहत असतो.मात्र अशा विकृतींचा बळी न पडता आपण यावर मात केली पाहिजे.

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000  म्हणजेच सायबर क्राईम अंतर्गत आपण अशा लोकांच्यावर गुन्हा दाखल करू शकतो.सायबर सेल अशा गुन्हेगारांचा त्यांच्या मोबाईल क्रमांक व त्याचा आयपी अड्रेस यावरून ह्या व्यक्ती कोण आहेत, त्यांचं लोकेशन कोणतं आहे या सर्व गोष्टींचा शोध काही मिनिटांत लावतात.


सोशल मीडियावरील वाईट विकृती

व्हर्च्युअल जग


अर्थात हे आहे व्हर्च्युअल जग इथं आपल्याला आपल्या भावना लोकांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी एक हक्काचं  व्यसपीठ मिळतं.आपल्या आयुष्यात घडणारे सुखदुःखाचे क्षण आपण या माध्यमातून  जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या लोकांच्या पर्यंत पोहचू शकतो.त्यांनाही आपण आपल्या सुखदुःखात सामील करून घेऊ शकतो.तेही आपल्या चांगल्या वाईट क्षणांचे साक्षीदार बनू शकतात.

या व्हर्च्युअल जगात काही लोकं सोडली तर आपण प्रत्यक्षात लोकांना ओळखत देखील नसतो.तरीही आपण आपल्या भावना,आपले अनुभव आपण सोशल मीडिया च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवत असतो.

सोशल मीडिया सारखा इतका चांगला हा सोअर्स काही विकृतींमुळे बदनाम होऊ नाही द्यायला पाहिजे.विज्ञान वरदानही आहे तसेच शाप ही आहे.याचा जितका जास्त फायदा आहे त्याच्याही पेक्षा जास्त नुकसान आहे.त्याला प्रतिबंध करणारे कायदे देखील आहेत.म्हणूनच अशा वाईट विकृतींचा बळी न पडता,न घाबरता त्यावर मात करायला शिकलं पाहिजे.

अशा लोकांना आपल्या नेटवर्क मधून सरळ काढून टाकावं आणि ब्लॉक ही करावं म्हणजे पुन्हा यांचा त्रास सहन करावा लागणार नाही.शक्यतो अनोळखी नंबर वरून फोन आला तर तो अटेंड करूच नका,आणि मेसेज आला तर त्याला रिप्लाय ही करू नका.

असं करून देखील पुन्हा पुन्हा अशा विकृत व्यक्ती कॉल करत असतील तर सरळ त्याला ब्लॉक करून टाका.हा व्यक्ती ब्लॉक करून देखील  दुसऱ्या कुठल्या तरी मोबाईल चा वापर करून पुन्हा त्रास देत असेल तर मात्र अशा विकृतींना आळा घालण्यासाठी आणि त्याचा प्रतिबंध करण्यासाठी कायद्याची, पोलिसांची मदत घेतलीच पाहिजे.


लेखन,

डॉ. मनिषा मोरे

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

  1. सध्याच्या परिस्थिती हीच आहे.माणसांना समजलं पाहीजे. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे.त्यांनी पर स्त्री मातेसमान मानली यांनी पण असे आचरणात आणले पाहिजे.
    पोलीस केस नाही मॅडम यांना ज्यांना असे माणसे त्रास देतात ना घरी जाऊन कानाखाली एक तरी मारावी.

    उत्तर द्याहटवा
  2. I have also faced such weird and nonsense people.They should be beaten a lot. We should have to punish them before telling the police

    उत्तर द्याहटवा
  3. Khrch ya lokana evdha kshacha majj asto ky mahit tyancha purshi ahnkar yamdhe ndla jato tyana watat aapn purush aahot mhntlyavr aapn kahihi kru shkto tyana watat mahila mhnje fkt ek instrument aahelok je use and throw kru shkto ase nirljjj vichar krnare he mahangg astat khr tr te swtachya Aai bhinilapn te tyach nzretun bght asnar aahet mhnun tr te evdhe pudhchya thrala jatat....kuthe aaple mharaj aaani kute he dridri vicharanche bhngar lok😶 khrch khup avghd aahe mahilanche jivan

    उत्तर द्याहटवा

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏