सर्वांचे मनापासून आभार

 तुमच्या सहयोगाबद्दल मनस्वी आभार


Thank you message,आभार प्रदर्शन

सर्वांचे मनापासून आभार

एक उदात्त हेतू ठेऊन ' मधूषाब्लॉग्स ' ब्लॉग सुरू करण्यात आला.ब्लॉग चं ब्रीदवाक्य 'वाचनातून प्रेरणा' हे आहे.या ब्लॉग च्या माध्यमातून वाचक प्रेमींना प्रेरणादायी, शैक्षणिक , सामाजिक तसेच पारंपरिक सण व उत्सव याविषयी माहिती असणारे नवनवीन लेख वाचायला मिळणार आहेत. 

ब्लॉग मराठी भाषेमध्ये सुरू करण्यात आला कारण, आपल्या मनातील भावना ह्या आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतून तितक्या सहज,आणि सोप्या पद्धतीने वाचकांच्या मनाला स्पर्श करतील इतक्या सहज लिहू शकत नाही.

आपण लिहिलेलं लिखाण मग ते कोणत्याही विषयावर असो जे आपल्या मनातून आणि सहज आलं असेल तर मुळात आपण खुश होतो,समाधानी होतो.आपण समाधानी असू तर वाचकांना नक्कीच ते आवडते. 

लेख कोणताही असो त्यातून काही न काही संदेश लोकांपर्यंत, माझ्या वाचकांपर्यंत पोहचवणं हाच उदात्त  हेतू  डोळ्यासमोर ठेऊन ह्या ब्लॉग ची निर्मिती करण्यात आली.लेख वाचत असताना लोकांची अशी भावना झाली पाहिजे की, आपण जे वाचत आहोत हे आपल्याच आयुष्याशी तर निगडित नाही ना?.


आभार प्रदर्शन, aabhar pradarshan

मनस्वी आभार

मधूषाब्लॉग्स च्या सर्व वाचकांचा, सर्व सदस्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.आपल्या मनातील भावना,आपले विचार ऐकण्यासाठी समोर कोणीतरी असावा लागतो.आपले विचार ऐकल्यावर ते बरोबर आहेत , चूक आहेत हे सांगण्यासाठी कुणीतरी असावं लागतं.आपले विचार पटत असतील तर भरभरून प्रेम करणारी लोकं असावी लागतात.आपले विचार पटत नसतील तर प्रामाणिकपणे ते आपल्याला सांगणारी लोकं असावी लागतात.अशाच अभिप्रायामुळं प्रेरणा मिळते,प्रोत्साहन मिळतं.वाचकांच्या अभिप्रायामुळं एक वेगळीच ऊर्जा मिळते.समाधान मिळतं, सुख मिळतं, आनंद मिळतो.

आपण आनंदी असू , समाधानी असू तर मन प्रसन्न होतं. मन फ्रेश होतं. मन फ्रेश असेल तर लिहिण्यासाठी वेगवेगळे विषय सुचतात.याच लेखच्या, ब्लॉग लिखाणाच्या माध्यमातून माझ्या वाचकांसाठी वाचनाची चमचमीत मेजवानी मिळते. 

मधूषाब्लॉग्स चा 500 वाचकांचा आकडा पूर्ण झाला.हे पूर्ण करण्यासाठी तुम्हा सर्वांची मोलाची साथ लाभली,सहयोग लाभला.याच नंबर मध्ये अजून दोन शून्य लागण्यासाठी आणि हा नंबर 50,000 वर पोहचवण्यासाठी तुम्हा सर्वांची मोलाची साथ अशीच लाभेल याची मला खात्री आहे.

प्रेरणादायी, शैक्षणिक तसेच सामाजिक विषयावर भाष्य करणारे लेख वाचण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कृपया ही लिंक ( https://www.facebook.com/drmanishamore/ ) शेअर करा.

मधूषाब्लॉग्स वर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार.तुमचं प्रेम आणि तुमची मोलाची साथ,तुमची पोच पावती अशीच मिळत राहिल असा मला विश्वास आहे.


आपल्या इतर ब्लॉग ना भेट द्या.

Motivations To You

Daily Tech Updates



सर्व वाचकांचे मनापासून आभार.

🙏🙏 🌹🌹 🙏🙏


लेखन,

डॉ. मनिषा मोरे

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏