मनस्थिती बदलली की परिस्थिती नक्की बदलेल


मनस्थिती बदला परिस्थिती नक्की बदलेल



मनस्थिती बदला परिस्थिती सुधारेल

विचार बदला बदल घडेल


माणसाचं आयुष्य हे निसर्गाच्या ऋतुप्रमाणे असतं.एक ऋतू संपला की दुसरा ऋतू. कधी ऊन, कधी वारा तर कधी पाऊस.कधी उन्हाळा,कधी पावसाळा तर कधी हिवाळा.आपल्या जीवनातही सुखदुःखाचे असे अनेक ऋतू येत जात असतात.सुखासमाधानाचे ऋतू आले की हळूहळू दुःखाची पानगळ व्हायला लागते.

निसर्गाच्या चक्राप्रमाणे आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी अशी कोणतीच गोष्ट नाही.अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आयुष्याच्या या फेऱ्यामध्ये आपण सुखाच्या शोधात सतत धावत असतो.खूप मेहनत करत असतो.खूप कष्ट घेतल्यानंतर सुखाचा वर्षाव होऊ लागतो मात्र त्याबरोबरच दुःखही चोर पावलांनी आपल्या आयुष्यात आपल्या मनात नकळतपणे शिरकाव करत असते.


यश अपयश, depresion

नैराश्य


काहींना यश मिळतं.काहींना खूप मेहनत करून देखील सुख समाधान मिळत नाही.यश मिळत नाही.सगळेच प्रयत्न फसतात.मग लोकं दुःखी होतात,उदास होतात,नैराश्याच्या आहारी जातात.त्यांना सगळं व्यर्थ आहे असं वाटायला लागतं.अपयशाच्या वेदनेने मन अगदी उदास होऊन जातं.लाकूड पोखरणारा कीड लाकूड पोखरून पोकळ करून टाकतो त्याचप्रमाणे अपयशाच्या वेदनेने मन पोखरून टाकलं जातं.आयुष्यात सगळंच व्यर्थ आहे जगण्यात काहीच अर्थ नाही असं कदाचित वाटू शकतं.


Happy life

आनंदाची पहाट


मात्र आपल्या आयुष्यात आनंदाची पहाट फुलवायची असेल तर वेदनेचे,दुःखाचे दरवाजे कायमस्वरूपी बंद केले पाहिजेत.सुखदुःख ,यश अपयश हे चक्र नेहमी सुरूच राहणार आहे.परिस्थिती वर मात करण्यासाठी आपली मनस्थिती बदलली पाहिजे.चौकटीबाहेर जाऊन विचार केला की मार्ग आपोआप निघतो.मनस्थिती बदलली की परिस्थिती आपोआप सुधारते.

नदीच्या पात्रातून बाहेर पडलेलं पाणी प्रवाहाच्या बाहेर पडलं म्हणून त्याचा प्रवाह थांबत नाही.प्रवाहाच्या बाहेर पडूनसुद्धा आपला मार्ग वेगळा करत वाहत राहतं.

एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी एक मार्ग बंद असेल तर तिथपर्यंत पोहचण्यासाठी अनेक मार्गांचा उपयोग करू शकतो तसंच आपल्या आयुष्यात ही करायला हवं.

एखादं काम झालं नाही म्हणून ते आर्ध्यातच सोडून न देता त्याचा पाठपुरावा करून ते तडीस नेण्याची जिद्द हवी.एका गोष्टीत अपयश आलं म्हणून तिथंच न थांबता अपयश कशामुळे आलं याची कारणं शोधून त्याच्यावर मात केली पाहिजे.एक मार्ग बंद झाला तर दुसरे अनेक मार्ग शोधून पुढे वाटचाल केली पाहिजे.

असं म्हणतात माणूस जन्माला येताना त्याचं भाग्य,त्याचं नशीब घेऊन आलेला असतो.आयुष्य जगत असताना आपल्या जीवनात अनेक कठीण प्रसंग येतात.खूप वाईट अनुभव येत असतात.कधी खूप सुख भोगायला मिळतं तर कधी दुःखाचा डोंगर वाट्याला येत असतो.

हा दुःखाचा डोंगर झेलण्याचं सामर्थ्य नक्कीच आपल्यामध्ये आहे.गरज आहे मानसिकता बदलण्याची.चाकोरीच्या बाहेर जाऊन वेगळा विचार करण्याची.आपल्या विचारांची दिशा बदलण्याची.फक्त शरीरानेच नव्हे तर मनानेही तरुण राहण्याची.मन तंदुरुस्त ठेवण्याची.मन निरोगी ठेवण्याची,मळलेल्या वाटेवरून न जाता नवीन वाट निर्माण करण्याची.

जो थांबला तो आयुष्याच्या शर्यतीतून बाद झाला.जर आयुषयाच्या शर्यतीमध्ये पदक मिळवायचं असेल आणि विजयश्री खेचून आणायची असेल तर स्वतःला सक्षम बनवून शर्यतीसाठी तयार केलं पाहिजे.

विचार बदला बदल घडेल.

मनस्थिती बदला सुधार घडेल.


लेखन,
डॉ. मनिषा मोरे

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

  1. अगदी बरोबर आहे,आपल्या आयुष्यात सुख आणि दुःख येतच असतं ,पण आपण खंबीर राहून त्यावर मात केली पाहिजे.वेगळा विचार केला पाहिजे

    उत्तर द्याहटवा
  2. Khrch brobr aahe aapn aapla vichar bdlala ki badl nkkich ghdu shkto......aaple prytnya jast astil tr aapn kahihi aani kashi kru shkto fkt aaple pryntya asave lagtat...

    उत्तर द्याहटवा

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏