एक आगळा वेगळा विवाह सोहळा

 एक आगळा वेगळा विवाह सोहळा

सत्यशोधक विवाह


नाव सुनील वसंत पाटील राहणार वशी तालुका वाळवा जिल्हा सांगली सर्वसामान्य कुटुंबात, शेतकरी कुटुंबात, गरीब कुटुंबात जन्मलेला हा मुलगा  लहानपणापासूनच इतरांपेक्षा काहीतरी वेगळा होता. सतत धडपडी, सतत काहीतरी करत राहणारा, सतत मित्रांना जमवून प्राण्यांची, माणसांची मदत करणारा. 

जसजसा मोठा होत गेला तसतसं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याने प्रेरित होऊन आणि पुढे आपले थोर समाजसुधारक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन आपलं संपुर्ण आयुष्य राहिलं मात्र आपण नुसता मदतीचा हात जरी या 'रंजल्या गांजल्या', गरीब, पिढीत, दुःखी, अज्ञानी, मागासलेल्या लोंकांसाठी पुढे केला तर आपलं आयुष्य सार्थक होईल. हाच विचार करून, हाच मानस ठेवून आपल्या या पराक्रमी पुरुषांच्या, महान थोर समाजसुधारकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत, या आपल्या समाजात या सर्वांच्या विचारधारेने प्रेरित होऊन लोकसेवेचं, समाजसेवेचं व्रत हाती घेतलं.

उच्च शिक्षित असणारा हा मुलगा नोकरीच्या खूप चांगल्या संधी चालून येत असताना काहीतरी वेगळंच करतोय हे घरच्यांना आणि स्वाभाविकच समाजाला खटकत होतं. कामधंदा सोडून चार बारक्या बारक्या पोरासनी गोळा करून कायतरी उपद्व्याप आपलं पोरगं करतंय. नोकरी करून पैसा मिळवायचा सोडून जवळचं पैसे कुणासाठी तरी खर्च करतोय. अशा प्रकारे टोमणे त्याला त्याच्या घरच्यांकडून आणि समाजाकडून ऐकायला मिळत होते.

म्हणतात ना 'जया अंगी मोठेपण तया यातना कठीण'. लोकांची बोलणी ऐकून तो कधी थांबला नाही. याउलट तो रुळलेल्या वाटेवरून न चालता त्याने प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन इतरांपेक्षा वेगळा मार्ग निवडून वाटेत येणारे छोटे मोठे संकट पार करत करत त्याने लोकसेवेचं कार्य हळूहळू वाढवत नेलं आणि यातूनच सेवाभावी संस्थेचा जन्म झाला.

याच त्याच्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्याने केलेल्या कार्याचा लेखाजोखा,

बालक, युवक, युवती, महिला, जेष्ठ नागरिक, शेतकरी, कामगार तसेच निराधार लोकांना त्यांच्या न्याय व हक्काची जाणीव  करून देणे व त्या सर्व घटकातील लोकांना सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी ज्ञान देणे, त्यांचं प्रबोधन करणे आणि समृद्ध कुटुंब बनविणे हे ध्येय उराशी बाळगून गावापासून ते राष्ट्रपर्यंत आपल्या कामाची व्यप्ती वाढवणे असं स्वप्न पाहून ते सत्यात उतरवण्यासाठी धडपड करणाऱ्या या उमद्या तरुणाची कहाणी.

कुटुंब समृद्ध झालं की गावं समृद्ध होतील, गावं समृद्ध झाली की राज्य समृद्ध होईल आणि राज्य समृद्ध झालं की आपलं राष्ट्र, आपला देश आपोआपच समृद्ध होईल एवढा उदात्त हेतू उराशी बाळगून त्याने सुरू केलेल्या अगदी 'सिंहाचा नाही पण खारीचा वाटा' आपण पाहुयात.

लोकांच्या लोक सहभागाच्या माध्यमातून लाखो लोकांच्या पर्यंत पोहचून शेकडो मूले जेष्ट यूवक यांना योगा व व्यायाम  प्रशिक्षन दिले. 

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात तसेच कचरा व्यवस्थापन करण्यात यश. लोकसहभागातून उपलब्ध झालेल्या कचराकुंड्यांच्या माध्यमातून हजारो टन कचरा व्यवस्थापन.

जल व मृदा संधारण करून हजरो मेट्रिक टन गाळ उपसण्याचे काम केले.जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात यश. तसेच शासनाच्या वेगवेगळ्या योजना लोकांच्यापर्यंत पोहचवून त्यांना त्या त्या प्रकारच्या योजनांचा फायदा घेऊन देण्यास मदत केली. वृक्षारोपण सारखे कार्यक्रम राबवून हजारो झाडांची लागवड केली.

वेगवेगळ्या शाळांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून त्यांचं बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आले. लोकसहभागातून शाळेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात यश.

दर वर्षातून चार ते पाच वेळा रक्तदान सारखं महान दान करण्यासाठी भव्य रक्तदान शिबिरं आयोजित करून गरीब व गरजू आजारी पेशंट ला मोफत रक्ताच्या बॅगा पोहचविण्यात यश.

 अवयय दानाचं महत्व पटवून देऊन 250 पेक्षा अधिक लोकांचे अवयव दानासाठी फॉर्म भरून घेतले.

सर्प मित्रांच्या सहाय्याने विविध प्रकारचे सर्प प्राणी त्यांच्या प्राणिवांसात सोडण्यात आलं.

लोकांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांचं प्रबोधन करून वैयक्तिक व लोकसहभागातून सार्वजनिक वाचनालयाची सुरुवात करण्यात आली.

लोकसहभाग व वैयक्तिक माध्यमातून  विधवा अपंग निराधार परित्यक्ता 500 पेक्षाही जास्त लोकांना पेन्शन मिळवून देण्यासाठी काम केले.

अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी जनजागृती कार्यक्रम केले.

महापूर आपत्तीमध्ये लोकांना मदत, त्या ठिकाणची स्वच्छता, 2019 महापूर आपत्ती वरती चार महिने पूर्ण वेळ देऊन प्रशासन, सरकार, एनजीओ, राजकीय गणेश मंडळे आर्मी, नेव्ही यांच्या माध्यमातून आपत्ती ग्रस्त लोकांना शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेऊन कार्य पार पाडले.

कोरोना सारख्या वैश्विक महामारी कालावधीमध्ये गोर गरीब गरजू निराधार विविध घटकातील कुटुंबांना किंवा व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे कीट पुरवणे, कोरोना वैश्विक संकटामध्ये काम करणाऱ्या आरोग्य, पोलीस, पत्रकारिता क्षेत्रातील लोकांचा कोरोणा योद्धा म्हणून त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचं मनोबल वाढावं म्हणून त्यांना गौरविण्यात आले.

दोनशे विधवा परित्यक्ता निराधार महिलांचा अव्यक्त भावनांचा जागर महिला दिनानिमित्त कार्यक्रम राबवले, विधवा महिलांच्या साठी शासकीय योजनांचे मार्गदर्शन करणे  निराधार व विधवा महिलांना स्ववलंबी बनवण्यासाठी प्रशिक्षण शिबीर राबविले.

हे आणि अशी बरीच लोकोपयोगी कामं हातात घेऊन ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणारा आणि लोकसेवेचं व्रत हाती घेतलेला हा उमदा तरुण अजून एक स्तुत्य उपक्रम घेऊन आला आहे.

सुनील या नावातच सक्षमता आहे, उदारता आहे, रचनात्मकता आहे, मैत्रीपूर्ण आहे, अस्थिर आहे, आधुनिक आहे, गंभीर आहे, तो सदैव सक्रिय आहे आणि स्वैच्छीकही आहे हे सगळे गुण मिळाल्यामुळे तो खूप भाग्यशाली ही आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात लग्नासारखा शुभ मंगल प्रसंग येत असतो. त्याच्या आयुष्यात त्याला साथ देण्यासाठी त्याच्या सहचारिणीचं पदार्पण होत आहे. हा विवाहसोहळा काही साधासुधा नसून समाजाला प्रोत्साहन देणारा, समाजाला प्रेरणा देणारा असा हा एक आगळा वेगळा विवाहसोहळा ' सत्यशोधक विवाह ' आहे.


एक आगळा वेगळा विवाह सोहळा

प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून चि. सुनील व चि. सौ.कां. माया यांचा शुभ मंगल सोहळा पार पडणार आहे. आपण जे व्रत हाती घेतलं आहे त्याला साजेसा लोकांना प्रेरणा देणारा असा हा विवाहसोहळा. या आगळ्या वेगळ्या विवाहसोहळ्याचे साक्षीदार होऊन लोकसेवेचं व्रत हाती घेतलेल्या या नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद देऊन त्यांचं हे लोकसेवेचं, समाजसेवेचं कार्य असंच अविरत वाढत जावो तसेच त्याची व्याप्ती गावापासून ते थेट देशपातळीवर लवकरच पोहचवण्यासाठी भरभरून शुभाशिर्वाद देऊन त्यांचं मनोबल जरूर वाढवा.


लेखन,

डॉ. मनिषा मोरे

व्हाट्सएप 9511775185




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏