नवोदित लेखकांसाठी लिखाणाची सुवर्णसंधी


लेखकांसाठी सुवर्णसंधी


तुम्हाला लिहायला आवडतं? 

तुम्ही कथा,कविता,चारोळ्या, लेख लिहिता? 

तुम्हाला तुमचं लिखाण जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जायचंय?

तुम्ही लिखाण भरपूर केलंय , पण ते लोकांच्या पर्यंत पोहचलंच नाही?

तुम्हाला तुमचं लिखाण ब्लॉग च्या माध्यमातून विनामूल्य प्रकाशित करायचंय? 


विनामूल्य आपलं लिखाण जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाण्यासाठी आणि वाचकांची दाद मिळवण्यासाठी या संधीचा फायदा जरूर करून घ्या.तुमचे लेख आपल्या ब्लॉग ला पाठवा आणि विनामूल्य इंटरनेट वर प्रकाशित करून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवा. 

 Motivations To You ( मोटिव्हेशन्स टू यू ) हा आपला मनपसंत मराठी ब्लॉग घेऊन येत आहे नवोदित लेखकांसाठी लेखनाची सुवर्णसंधी.

तुम्हाला लिखाणाची आवड आहे आणि तुम्ही बऱ्यापैकी लिखाणही केलं आहे.पण वेळेअभावी किंवा प्रकाशन करण्याची पुरेशी माहिती नसल्या कारणाने तुमचं लिखाण कुठेही प्रकाशित होऊ शकलं नाही अशा सर्व लेखकांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

थोडसं आपल्या ब्लॉग विषयी माहिती घेऊ.

Motivations To You ( मोटिव्हेशन्स टू यू ) हा आपला मराठी ब्लॉग इंटरनेट वर HTTPS://motivationstoyou.blogspot.com  या ऍड्रेस वर आहे.म्हणजे जसं आपण एखादं पुस्तक किंवा कादंबरी एखाद्या प्रकाशकाच्या मदतीने प्रकाशित करतो.त्याचप्रमाणे इंटरनेट वर माझं लिखाण प्रकाशित करण्यासाठी घेतलेलं एक खूप महत्त्वाचं ठिकाण आहे.याचा खूप महत्त्वाचा फायदा असा आहे की, 

एकदा का लिखाण प्रकाशित केलं की ते ग्लोबली म्हणजेच संपुर्ण जगभर प्रकाशित होतं. जगाच्या कानाकोपऱ्यात असणारे वाचक तुमचं लिखाण वाचू शकतात.फक्त या आपल्या ब्लॉग चा इंटरनेट वरचा ऍड्रेस माहीत पाहिजे किंवा ब्लॉग पोस्ट ची लिंक हवी आहे.लिंक वर क्लिक केलं की डायरेक्ट ब्लॉग ऍड्रेस वर जाता येतं.

याची वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता,तुमच्या भावना कळवू शकता,तुम्ही ब्लॉग  चे मेम्बर होऊ शकता तसेच एखादं लिखाण तुम्हाला आवडलं असेल तर ते तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर ही करू शकता.

हा ब्लॉग गुगलने डिझाइन केलेला आहे.जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वांसाठी हा ओपन असल्याने त्याला सिक्युरिटी ही तेवढीच दिली आहे.आपलं लिखाण इंटरनेट वर असून सुद्धा कोणी कॉपी पेस्ट नाही करू शकत.जर कुणी तसं करायचा प्रयत्न केला तर आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येतं. एवढं सुरक्षित आहे आपलं लिखाण.

खाली दिलेल्या विषयांपैकी कोणतेही विषय तुम्ही निवडू शकता.सर्वात पहिली थीम आहे ,

 पहिली अविस्मरणीय आठवण
1.पहिली शाळा।          2. पहिल्या शिक्षिका
3. पहिला मित्र।            3. पहिलं भांडण
4. पहिला पडलेला मार।  5.पहिली चोरी
6.पहिला प्रवास।             7.पहिली नोकरी
8. पहिला अपघात।          9.पहिला पगार
10. पहिली शॉपिंग।          11. पहिला मोबाइल
12.पहिला पाऊस।           13. पहिली सहल
14.पहिलं प्रमोशन।           15.लग्न
16. पहिलं प्रेम।                17.पहिलं अपत्य
18. पहिला शाळेचा निकाल
ह्या आणि अजून बऱ्याच विषयांना अनुसरून तुम्ही लिखाण करू शकता.

लिखाणासाठी काही नियम:

  • लिखाण तुमचं स्वतःचं असावं.कुणाचं तरी कॉपी पेस्ट केलेलं नसावं.( प्लाजियरिझम फ्री )
  • लिखाण मराठी भाषेमध्ये असावं.
  • शब्दमर्यादा किमान 100 असावी.जास्तीत जास्त मर्यादा नाही.
  • लिखाण उत्कृष्ट दर्जाचं असावं.
  • लिखाणासाठी ऑडिओ,व्हिडीओ किंवा इमेजेस घेणार असाल तर त्या गुगल वरून फ्री डाउनलोड असणाऱ्याच असाव्यात.कॉपी राईट फ्री असाव्यात.
  • लिखाण वर्ड फाईल मध्येच असावं.
  • तुमचे नाव , पत्ता आणि संपर्क डिटेल द्याव्या लागतील.
  • एखाद्याला वाटत असेल त्यांचं लिखाण अनामिक म्हणून प्रकाशित करावं तर ते केलं जाईल परंतु आमच्या माहितीसाठी तुमचे डिटेल पाठवणं अनिवार्य असेल.
  • प्रकाशनासाठी कोणतंही शुल्क नाही.

नवोदित लेखकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.कथा,कविता,चारोळ्या,लेख अशा कोणत्याही प्रकारामधील तुमचं लिखाण प्रकाशित करण्यासाठी आणि ते ग्लोबली लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्यासाठी या संधीचा फायदा सर्वानी घ्यावा.

आपल्या ब्लॉगला ग्लोबली म्हणजेच संपुर्ण जगभरातून कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासाठी खलील इमेज पहा.



Global response of blog

Global blog response



तुमच्या काही शंका असतील तर खलील नंबर वर संपर्क साधा.


 संपर्क
ई-मेल: mayumadhu@gmail.com
व्हाट्सअप: 9511775185




लेखन,
डॉ. मनिषा पाटील-मोरे
व्हाट्सएप--9511775185

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏