ती…
ती जन्म घेते… आणि
नव्या जीवाला जन्म देण्याचं सौभाग्यही तिचंच…
ती सावरते, आणि तीच सगळं आवरते,
घराला आकारही तीच देते.
ती एक… पण तिच्या भूमिका अनेक.
कधी आई बनून मायेची सावली देते,
कधी मुलगी बनून घराला आनंद देते.
कधी पत्नी बनून आयुष्यभर साथ देते,
तर कधी बहीण बनून नात्यांना आधार देते.
ती प्रत्येक भूमिकेत वेगळी जबाबदारी सांभाळते,
प्रत्येक भूमिकेत वेगळ्या अपेक्षा पूर्ण करते…
तरीही चेहऱ्यावर हसू ठेवून,
ती सगळं शांतपणे निभावत राहते.
ती वाहते सदैव जबाबदाऱ्यांचं ओझं,
तरीही चेहऱ्यावर धैर्याची झळाळी असते…
कितीही वादळं आली आयुष्यात,
तरीही तीच घराला स्थैर्य देणारी शक्ती असते.
ती स्वतःच्या स्वप्नांना क्षणभर थांबवते,
पण इतरांची स्वप्नं पूर्ण करत राहते.
तिच्या कष्टांच्या प्रकाशात घर उजळतं,
आणि तिच्या त्यागाने संसार फुलत राहतो.
स्त्री म्हणजे फक्त व्यक्ती नाही,
ती आहे प्रेम, त्याग आणि प्रेरणेचा अथांग सागर,
मायेची कधीही न आटणारी धार,
आणि जीवनाला अर्थ देणारी भावना.
माझ्या सर्व भगिनींना
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रा. डॉ. मनिषा पाटील-मोरे

0 टिप्पण्या
कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏