पोलिस दल आणि AI: ज्ञानदानाचा अभिमानास्पद अनुभव

 

पोलिस दल आणि AI: ज्ञानदानाचा अभिमानास्पद अनुभव


सामान्यतः लोक म्हणतात, "शहाण्या माणसाने पोलिस आणि कोर्टाच्या वाटेला जायचे नाही." पण जेव्हा या पोलिस दलासमोर काहीतरी उपयुक्त सादर करण्याची संधी मिळतेतेव्हा तो अनुभव शब्दांत मांडणे कठीण असते. मला असाच एक सुवर्णयोग आलाजेव्हा मला श्री बालाजी युनिव्हर्सिटीपुणे येथे 26 मार्च 2025 रोजी पोलिस आयुक्तालयपिंपरी-चिंचवडच्या पोलिस अधिकाऱ्यांसाठी “कायदा अंमलबजावणीमध्ये AI ची भूमिका” या विषयावर सत्र घ्यायची संधी मिळाली.

ही संधी म्हणजे माझ्यासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट होती. पोलिस दल हे आपल्या देशाची सुरक्षितता राखणारे खरे रक्षक” आहेत. या सत्रामध्ये पोलीस कॉन्स्टेबलहेड कॉन्स्टेबलपोलीस उपनिरीक्षकसहायक पोलीस निरीक्षकपोलीस निरीक्षक असे एकूण 265 अधिकारी होतेतसेच सायबर पोलिस स्टेशनक्राईम ब्रँच आणि संपूर्ण 22 पोलीस ठाण्यांमधील कर्मचारी उपस्थित होते. एरवीमी प्रामुख्याने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असते. पण आज माझ्यासमोर होते देशसेवा करणारेनागरिकांच्या सुरक्षेचे व्रत घेतलेले हे अधिकारी.

जेव्हा डॉ. शिवाजी बोठे सरांनी मला विचारले कीपोलिसांसाठी सत्र घेणार कातेव्हा पहिल्यांदा मनात थोडी भीती दाटून आली. पोलिस दलासमोर उभं राहून त्यांना AI शिकवायचंहे विचार जरा धक्कादायक वाटले. पण मग स्वतःलाच प्रश्न केला – "अशी सुवर्णसंधी परत येईल का?" आणि मी लगेचच होकार दिला.  जेव्हा DCP सरांनी सांगितले की सत्र मराठीत घ्यायचे, तेव्हा मनात विलक्षण आनंद झाला. कारण मातृभाषेत संवाद साधणं अधिक सोपं आणि प्रभावी असतं. ही संधी म्हणजे "सोने पे सुहागा" होतीपण तीच एक मोठं आव्हानही होतं! AI मधील जटिल संकल्पना मराठीत समजावून सांगणे आणि त्या पोलिस दलाच्या कार्यपद्धतीशी जोडणेहे माझ्यासाठी एक नवा अनुभव होता. पण हे आव्हान स्वीकारून त्यावर यशस्वी मात करणेहेच माझ्या या प्रवासाचे खरे सार आहे!

सत्राची तयारी सुरू केली. PPT इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये तयार केल्या. पण आव्हान होतं, AI च्या तांत्रिक संज्ञा मराठीत समजावून सांगणं! तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक शब्द थेट इंग्रजीत वापरण्याची सवय असतेपण आता ते पोलिसांच्या दैनंदिन कार्यपद्धतीशी जोडून सोप्या भाषेत मांडायचे होते. त्यासाठी AI काय आहेत्याचे प्रकार कोणतेपोलिस खात्यात AI कसा उपयोगी ठरू शकतो? याची उदाहरणे शोधली. गुन्हेगारी तपाससायबर गुन्हेचेहरे ओळखणारी प्रणालीगुन्ह्यांचे विश्लेषण – या सर्व गोष्टींसाठी AI कसे उपयुक्त ठरतेयावर भर दिला.

सत्र तीन टप्प्यांमध्ये होते – पहिल्या तासात AI च्या मूलभूत संकल्पनात्याचे फायदे आणि त्याचा कायदा अंमलबजावणीतील वापर समजावून सांगितला. ब्रेकनंतरच्या दुसऱ्या सत्रात पोलिसांच्या दैनंदिन कामकाजात AI चा उपयोग आणि त्याचे प्रत्यक्ष उदाहरणे मांडली. त्यानंतर शेवटी एक चाचणी (Test) घेतलीज्यामुळे त्यांच्या समजुतीची खात्री झाली. सकाळच्या एका बॅचसाठी वेगळे आणि दुपारच्या बॅचसाठी वेगळे असे दोन सत्र घेतले.

संपूर्ण रात्र जागून सत्राची तयारी केलीपण थकवा जाणवला नाही. दुसऱ्या दिवशी सलग पाच तास उभं राहून सत्र घेतलंतरीही चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहच होता. शेवटी DCP बांगर सरांनी माझा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केलातो क्षण माझ्यासाठी खूप अभिमानाचा होता. सन्मानापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे DCP सर स्वतः सत्राच्या सुरुवातीला हजर राहिले आणि सत्र पूर्ण झाल्यावरही त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. 

शिक्षक म्हणून मी रोज विद्यार्थ्यांशी संवाद साधतेत्यांना शिकवतेप्रश्न विचारतेआणि कधी प्रसंगी रागावतोही. हा माझा नेहमीचा दिनक्रम असतो. विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी विविध पद्धती वापराव्या लागतात.  पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. माझ्यासमोर विद्यार्थी नव्हतेतर पोलिस दलातील वेगवेगळ्या स्तरांवरील अधिकारीपोलिस बांधव आणि भगिनी बसले होते. पणजेव्हा मला पोलिस दलातील अधिकाऱ्यांसमोर AI आणि त्याच्या कायदा अंमलबजावणीतील उपयोगांविषयी सत्र घ्यायचे होतेपोलिस दलातील अधिकारीजे आपल्या समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत असतातत्यांच्यासमोर सत्र घेण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आणि सन्मानाची गोष्ट होती.  ही एक मोठी जबाबदारी वाटली. कारण ज्या व्यक्तींच्या नावाने आपण बरेचदा भितोत्यांच्यासमोर बोलायचं होतं. ही भीती म्हणजे आदरयुक्त भीती होती. असे शिस्तबद्ध आणि कर्तव्यदक्ष लोक आपलं ऐकणार आहेतत्यांच्यासमोर एक सत्र घ्यायचं आहेही कल्पनाच थोडी दडपण आणणारी होती.

पण हे दडपण दूर करण्याचे काम डीसीपी बांगर सर यांनी अगदी सहजतेने केले. त्यांनी माझी ओळख करून देताना मला एका अनुभवी संशोधक आणि तज्ज्ञ वक्ता म्हणून सादर केले. त्यांच्या ओळखीमुळे मला जणू एक सकारात्मक ऊर्जा मिळाली. कधी कधी आपल्याला ज्या गोष्टीची जाणीव नसतेती दुसऱ्या व्यक्तीच्या कौतुकातून मिळते. जेव्हा कोणी आपले काम मान्यतेने पुढे मांडतेतेव्हा एक वेगळीच प्रेरणा मिळते आणि याच प्रेरणेमुळे माझ्या सत्राला अधिक आत्मविश्वास प्राप्त झाला.



या सत्रादरम्यान मी AI कशा प्रकारे कायदा अंमलबजावणीमध्ये वापरला जात आहेत्याच्या मर्यादा आणि संधी यावर सविस्तर चर्चा केली. अधिकारी मोठ्या उत्साहाने ऐकत होतेप्रश्न विचारत होते आणि त्यांच्या व्यावहारिक अनुभवांबाबतही चर्चा करत होते. हा अनुभव अत्यंत समृद्ध करणारा ठरला.

पोलिस दल आणि AI या विषयावर संवाद साधताना मला जाणवलं की तंत्रज्ञान आणि कायदा यांचा संगम किती महत्त्वाचा आहे. पोलिस दलासाठी AI वापरण्याचे अनेक मार्ग असू शकतात आणि त्यांच्या दैनंदिन कार्यात ते नक्कीच उपयुक्त ठरू शकते. या सत्राचा अनुभव अविस्मरणीय होता, आणि मी यापुढेही अशा सत्रांसाठी नेहमीच उत्सुक राहीन.

जर माझ्या सत्रामुळे अधिकाऱ्यांना AI सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख झाली असेल आणि पोलिस दलामध्ये त्याचा उपयोग कसा करता येऊ शकतो हे उमगले असेलतर ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. जेव्हा अधिकाऱ्यांचे फोन आले आणि त्यांनी सांगितले – "मॅडम, AI च्या मदतीने इतकं काही करता येऊ शकतं हे आम्हाला कल्पनाही नव्हती!" तेव्हा जाणवलं की माझ्या सत्रामुळे एका नवीन तांत्रिक परिवर्तनाचा विचार पोलिस दलात सुरू झाला आहे.




तंत्रज्ञान आणि पोलिस दल यांचा संगम समाजाच्या सुरक्षिततेसाठी नवी दिशा देऊ शकतो. जर माझ्या सत्रामुळे अधिकाऱ्यांना हे जाणवले असेल की AI फक्त एक संकल्पना नसूनगुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा अंमलबजावणीसाठी एक प्रभावी साधन आहे, तर ही माझ्यासाठी एक मोठी मनःपूर्वक समाधानाची गोष्ट आहे.  


या संस्मरणीय क्षणासाठी मी डीसीपी बांगर  सर, यांचे मनःपूर्वक आभार मानते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि पाठिंब्यामुळे मला हा अनोखा अनुभव घेण्याची संधी मिळाली.

 

 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या