एमसीए नंतर आयटी क्षेत्रात नोकरीच्या विविध संधी

 एमसीए नंतर आयटी क्षेत्रात नोकरीच्या विविध संधी






विद्यार्थी मित्रहो,

एमसीए करण्याचा विचार करत आहात? तुम्ही अगदी योग्य विचार करत आहात. अगदी योग्य निर्णय आहे तुमचा.

पण! विद्यार्थी मित्रांनो कोणतीही गोष्ट करत असताना त्याचे फायदे काय आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला किती खर्च येणार आहे, इथे तुम्ही कोणते विषय शिकणार आहात आणि विशेष म्हणजे हा कोर्स केल्यानंतर आयटी क्षेत्रात कोणकोणत्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे.

या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेणं खूप गरजेचं आहे.  कारण तुम्ही या कोर्स साठी खुप पैसा खर्च करणार आहात, खूप वेळ देणार आहात आणि काही स्वप्न उराशी बाळगून हा कोर्स पूर्ण करणार आहात. 

सर्वात प्रथम जाणून घेऊ या पुणे विद्यापीठ अंतर्गत असणारा एमसीए कोर्स आणि शिकवल्या जाणाऱ्या विविध  टेक्नॉलॉजी, 

पुणे विद्यापीठ संलग्नित कोणत्याही कॉलेज ला एमसीए साठी प्रवेश घेणार असाल तर हा कोर्स दोन वर्षांचा असेल. दोन वर्षात एकूण चार सेमिस्टर असणार आहेत. 

पुणे विद्यापीठाचा  एमसीएचा  सध्याचा सिलबस हा लेटेस्ट आयटी ट्रेंड नुसार अपडेट केलेला आहे. 

सध्याच्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजेच बिग डेटा, डेटा मायनिंग, क्लाउड कॉम्प्युटिंग, नेटवर्किंग अँड सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, डेटा अनालायटिक्स, बिझनेस अनालायटिक्स, आर्टिफिसीयल इंटेलिजन्स, अटोमेटेड टेस्टिंग आणि बरेच.

या कोर्स साठी सर्वसाधारणपणे एका वर्षासाठी ऐंशी हजार ते एक लाख खर्च येणार आहे. मात्र तुमचा प्रवेश जर कॅप द्वारे झाला असेल आणि तुम्ही योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता केली असेल तर सरकारकडून त्या त्या कास्ट साठी ज्या सवलती, स्कॉलरशिप दिल्या जातात त्या द्वारे प्रवेश निश्चित झाला की खूप कमी फी मध्ये किंवा खर्चात आपलं एमसीए पूर्ण करता येणार आहे.

एमसीए नंतर आयटी क्षेत्रात करिअर च्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत ?

1.  सॉफ्टवेअर डेव्हलपर/ इनजिनियर/ वेब डिझायनर/ अँड्रॉइड ऍप डेव्हलपर/ गेम डेव्हलपर:

सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणजे आयटी कंपनी मध्ये वेगवेगळ्या फिल्ड रिलेटेड सॉफ्टवेअर तयार करायचं काम करावं लागतं. सध्या आयटी इंडस्ट्री मध्ये लेटेस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत त्यामध्ये तुम्ही डेव्हलपर म्हणून काम करू शकता

लेटेस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज

पायथॉन   :   पायथॉन डेव्हलपर

जाव्हा।     :   जाव्हा डेव्हलपर

डॉट नेट।    :   डॉट नेट डेव्हलपर

C, C++     :    सी प्लस प्लस डेव्हलपर

 SQL         :     SQL डेव्हलपर

HTML, PHP, CSS, Java स्क्रिप्ट, VB Srcipt या लॅंग्वेज जर चांगल्या असतील तर वेब डिझायनर म्हणून नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

इंटरनेट टेक्नॉलॉजी सारखे विषय शिकून आणि तंत्रज्ञान आत्मसात करून अँड्रॉइड अँप डेव्हलपर म्हणून देखील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

कोविड काळात ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरू झाली आणि तुमच्या हातात मोबाईल जास्तीत जास्त वेळेसाठी आला. आणि याच काळात मोबाईल वरून ऑनलाइन गेम खेळण्याचं प्रमाण देखील वाढलं. काही प्रोग्रामिंग लॅंग्वेज शिकून तुम्ही स्वतः गेम डेव्हलपर होऊ शकता. आयटी  मध्ये तुम्हाला गेम डेव्हलपर म्हणून खूप मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

2.  हार्डवेअर इनजिनियर

आपण जेव्हा कॉम्प्युटर सिस्टिम म्हणतो तेव्हा त्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्हींचा समावेश असतो. या दोन्ही शिवाय कॉम्प्युटर सिस्टीम पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीत हार्डवेअर इनजिनियर म्हणून देखील तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग लॅंग्वेज मध्ये इंटरेस्ट नाही असे विद्यार्थी या नोकरीचा विचार करू शकतात. फक्त हार्डवेअर आणि नेटवर्किंग चे काही सर्टिफिकेट कोर्सेस करणं गरजेचं आहे. 

3. डेटाबेस इनजिनियर / अडमिनिस्ट्रेशन

कोणतंही सॉफ्टवेअर वापरत असताना त्या माध्यमातून खूप मोट्या प्रमाणात माहिती साठवून ठेवली जाते तसेच ही माहिती जेव्हा जेव्हा हवी असेल तेव्हा ती ओपन करून हवं ते काम केलं जातं. ही माहिती मिळवणं आणि साठवून ठेवणं अशी कामं पूर्ण होण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करताना त्यासाठी लागणारा डेटाबेस डिझाईन करण्याचं काम हे डेटाबेस इनजिनियर करतात. अशा प्रकारच्या नोकरीच्या संधी आयटी इंडस्ट्री मध्ये उपलब्ध आहेत.

4.  सॉफ्टवेअर टेस्टिंग/ टेस्ट इनजिनियर

सॉफ्टवेअर तयार केल्यानंतर ते क्लायंट च्या मागणीनुसार तयार झालं आहे का, त्यामध्ये काही बिगाड आहे का, क्लायंट च्या सर्व गरजा पूर्ण केल्या जातात की नाही या गोष्टींचा अभ्यास करणं आणि त्याप्रमाणे पूर्तता करण्यासाठी मदत करणं हे काम करण्यासाठी सॉफ्टवेअर टेस्ट इनजिनियर ची गरज असते. 

5. क्लाऊड कॉम्प्युटिंग

आपला डेटा कायमस्वरूपी सेव्ह करून ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे डिव्हाईस वापरत असतो. पेन ड्रॉईव्ह, सिडी, मेमरी कार्ड्स, हार्डडिस्क आणि बरेच. हे डेव्हईस आपल्या जवळ उपलब्ध असतात. आपण डेटा कपॅसिटी नुसार आपण या डिव्हाईस मध्ये माहिती सेव्ह करून ठेवू शकतो. मात्र हे डिव्हाईस आपण जिकडे जाऊ तिकडे आपल्या सोबत घेऊन जावे लागतात.

क्लाऊड म्हणजे आपली माहिती सेव्ह करून ठेवण्यासाठी उपलब्ध असणारं इंटरनेट वरचं ठिकाण  याला व्हर्च्युअल स्पेस असं म्हंटलं जातं. उदाहरणार्थ आपण गुगल ड्रॉईव्ह चा वापर पंधरा जीबी पर्यंत फ्री स्पेस आपण वापरतो. 

अमेझॉन, गुगल आणि बरेच क्लाऊड सर्व्हिसेस आहेत. सध्या आयटी इंडस्ट्रीत क्लाऊड मध्ये खूप मोठया प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

6. डेटा सायन्स/ डेटा सायंटिस्ट/ डेटा इनजिनियर

इंटरनेट मुळे तसेच सॉफ्टवेअर ऑटोमयझेशन मुळं सध्या डेटा खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. या डेटाचा अभ्यास करून त्याच्यातून अचूक माहिती बाहेर काढणं आणि ही माहिती बिझनेस मधील निर्णय घेण्यास पुरविण्याचे काम डेटा सायंटिस्ट करत असतात. 

मागे काय घटना घडल्या आहेत याचा अभ्यास करून, त्या आधारे भविष्यात काय होऊ शकतं माहितीच्या आधारे याचं भाकीत करणं या बिजनेस विषयीच्या महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत मदत करण्यासाठी डेटा इनजिनियर काम करत असतात. इथे सध्या नोमरीच्या खूप मोठया संधी उपलब्ध आहेत. 

7. सायबर सिक्युरिटी/ डेटा सिक्युरिटी

2G, 3G, 4G आणि आता 5G टेक्नॉलॉजी. सगळ्या गोष्टी एका क्लीक वरती उपलब्ध होतात. आपली मनुष्यावरती अवलंबून राहण्याची सवय आता खूप कमी झाली आहे आणि इंटरनेट आणि टेक्नॉलॉजी वर अवलंबून राहण्याची सवय वाढली आहे. 

आपली सर्व महत्वाची आणि गुप्त माहिती सुद्धा सध्या या टेक्नॉलॉजी चा वापरामुळे एकमेकांना शेअर होऊ लागली. आणि हीच आपली महत्वाची माहिती चोरी होऊ नये, त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी सिक्युरिटी नियमांची तयारी करणे, चुकीच्या गोष्टी शोधून काढणे, त्या गोष्टी पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून नवीन सिक्युरिटी पॉलीसी तयार करणे आणि सर्व महत्त्वाची माहिती सुरक्षित राहील यासाठी सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन च्या माध्यमातून मदत करणं हे काम सायबर सिक्युरिटी / डेटा सिक्युरिटी इनजिनियर चं असतं. या क्षेत्रात देखील खूप मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.


पुणे विद्यापीठ अंतर्गत एमबीए आणि एमसीए अडमिशन प्रोसेस बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही निःसंकोचपणे खाली दिलेल्या नंबर वर कॉल करू शकता.

9511775185

डॉ. मनिषा मोरे

प्रोफेसर एमबीए/एमसीए, करीयर काऊन्सलर



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या